22 November 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Religious Adhyatma | आज अंगारकी संकष्टी चतुर्थी | गणेशाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा

Sankashti Chaturthi, Falgun

मुंबई, ०२ मार्च: आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. दोन्ही चतुर्थी गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.

दरम्यान आज या वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी त्यामुळे गणेशभक्तांमध्येही विशेष उत्साह आहे. गणेशाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंदिराबाहेर रांगा लावून गणपती चरणी डोकं ठेवण्यासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रार्दुभाव मंदिरावर काही निर्बंध लादले आहेत. यामुळे मुंबईतील जगप्रसिद्ध अशा प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अंगारकी चतुर्थी दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन न घेता आल्याने भाविक मंदिराबाहेर उभे राहून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी आलेले चित्र पाहायला मिळाले.

या दिवशी गणपतीच्या द्विजप्रिय स्वरुपाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. त्यांची उपासना आणि उपवास केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

 

News English Summary: Today is Sankashti Chaturthi in the month of Falgun. When Chaturthi falls on a Tuesday, it is known as Angarki Chaturthi. Hence it is called Angarki Sankashti Chaturthi. If Ganesha is worshiped on this day, all desires are fulfilled. There are two quarters each month. Both Chaturthi are dedicated to Ganesha. The Chaturthi that falls on Shukla Paksha is called Vinayak Chaturthi and the Chaturthi of Krishna Paksha is called Sankashti Chaturthi.

News English Title: Today is Sankashti Chaturthi in the month of Falgun news updates.

हॅशटॅग्स

#SankashtiChaturthi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x