22 November 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

अर्णब गोस्वामी यांना आज विधिमंडळात हजर राहण्यासाठी समन्स

Republic TV, editor Arnab Goswami, Re summoned, Legislative Committee

मुंबई, ०३ मार्च: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी नोटीस बजावूनही अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून, उद्या बुधवारी अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

दुसरीकडे TRP घोटाळ्यावरून रिपब्लिक टीव्हीच्या अडचणी पार्थो दासगुप्ता यांच्या अटकेनंतर प्रचंड वाढल्या होत्या. मात्र आता ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांना मुंबई मुंबई हायकोर्टाने काल जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने २ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला असला तरी पूर्व परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.

मुंबई हायकोर्टाने पार्थ दासगुप्ता यांना दोन लाखांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश कोर्टाने जामीन मंजूर करताना दिले. त्याचबरोबर दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट कोर्टाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

News English Summary: Republic TV editor Arnab Goswami has been re-summoned to appear before the Legislative Committee on Violations of Rights. The summons were issued to Arnab Goswami for not appearing before the court despite a previous notice. Arnab Goswami will have to appear before the legislature on Wednesday.

News English Title: Republic TV editor Arnab Goswami has been re summoned to appear before the Legislative Committee on Violations of Rights news updates.

हॅशटॅग्स

#ArnabGoswami(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x