16 April 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

आक्षेपार्ह सेक्स CD प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं | रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

Karnataka, minister Ramesh Jarkiholi, Resignation, Sexual harassment

बेंगळुरू, ०३ मार्च: भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. (Karnataka minister Ramesh Jarkiholi objectionable CD case political crisis)

जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. कलहळ्ळी यांनी जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. या सीडीमध्ये जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा त्यांनी केलाय. (He claimed that in the CD, Jarkiholi was talking about having sex with a young woman)

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. (Dinesh Kalhalli, chairman of the Civil Rights Struggle Committee, has brought the CD case before the media)

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे.

 

News English Summary: Karnataka Minister Ramesh Jarkiholi tenders resignation from his post in the wake of his alleged involvement in a sex tape case. His letter to CM reads, ‘Allegation against me is far from truth. As fair investigation should take place, I’m resigning on moral grounds.

News English Title: Karnataka minister Ramesh Jarkiholi tenders resignation after sexual harassment allegations sex CD news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या