23 November 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

Health First | अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा

Ashwagandha, cures many diseases, Ayurweda, health article

मुंबई, ०३ मार्च: दैनंदिन बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किंवा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले. प्राचीन काळापासून स्मरणशक्‍ती तल्लख ठेवण्यासाठी अश्‍वगंधा वापरली जाते. (Ashwagandha cures many diseases as per Ayurweda health article)

या वनस्पतीची मुळे, बिया, पाने, फळे सर्वच घटक उपयुक्‍त आहेत. लघवी साफ होण्यासाठी अश्‍वगंधा उपयुक्‍त आहे. मानसिक तणाव कमी व्हावा, शिवाय जोम, उत्साह आणि शक्‍ती वाढीस लागावी यासाठी अश्‍वगंधा वनस्पतींपासून आयुर्वेदाने अनेक उपयुक्‍त औषधे तयार केली आहेत. पुरुषांचा जोम वाढविण्यासाठी अश्‍वगंधा उपयुक्‍त आहे. (The roots, seeds, leaves and fruits of this plant are all useful)

  • विशेष म्हणजे अश्वगंधाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे, ही एक चमत्कारिक औषधी वनस्पती आहे जे बऱ्याच रोगांवर उपचार करण्यात प्रभावी मानली आहे. चला तर मग अश्वगंधांचे चमत्कारिक गुणधर्म जाणून घेऊ या.
  • अश्वगंधा चमत्कारिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात ह्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ह्याच्या मुळा आणि पानांपासून औषधे बनवतात.
  • तणाव, काळजी, थकवा, झोपेची कमतरता सारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचा उपचार अश्वगन्धाने करतात.हे तणाव देणारे कॉर्टिसॉल ची पातळी कमी करण्यात उपयुक्त आहे.
  • जर एखादा नैराश्याने वेढलेला आहे तर त्यावर उपचार करणे अश्वगंधाने शक्य आहे.
  • यामध्ये अँटी इंफ्लामेंट्री आणि अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असतात जे संसर्गापासून वाचवतात. तसेच हे हृदयाला निरोगी ठेवण्यात देखील मदत करतात.
  • अश्वगंधा कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार हे केमोथेरपीने होणारे दुष्परिणाम कमी करतात.
  • असे मानले जाते की ह्याचे मूळ वाटून जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून निघते.
  • या व्यतिरिक्त हे रोग प्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
  • असे मानले जाते की त्वचेच्या रोगाला दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचे आजार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

महत्वाची टीप: जर तुम्ही रोज औषधे घेत असाल किंवा गरोदर असाल, तर कृपया आधी डॉक्टरांच्या सल्ला आणि नंतर निर्णय घ्या.

 

News English Summary: In the daily market, there are white sticks called Askand or Ashwagandha, which are about the length of a finger and are as thick as the fingers of a small child. They are called Askand or Ashwagandha. Its fresh value smells as bad as horse urine. Hence the name Ashwagandha. Ashwagandha has been used since ancient times to keep memories fresh.

News English Title: Ashwagandha cures many diseases as per Ayurweda health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x