22 November 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप | शशिकला यांचा राजकारणातून संन्यास

AIADMK, Shashikala, announced decision, retired from politics

चेन्नई, ०४ मार्च: तामिळनाडूच्या राजकारणात ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. शशिकला यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी आपल्या समर्थकांना आणि AIADMK पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचं आणि DMK ला पराभूत करण्याचं आवाहन केलंय.

एकाबाजूला तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव भासणार आहे. तसेच, सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच, आता शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

 

News English Summary: Tamil Nadu politics is in full swing ahead of the Assembly elections. Shashikala, a close confidante of former Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa and a leader of the AIADMK, has announced her decision to retire directly from politics. Shashikala has issued an official statement in this regard. In it, he appealed to his supporters and AIADMK party workers to remain united and defeat the DMK.

News English Title: AIADMK Shashikala announced her decision to retired from politics news updates.

हॅशटॅग्स

#Tamil Nadu(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x