22 April 2025 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT
x

Health First | पोटावर झोपण्याची सवय आहे? | या समस्या उद्भवण्याची शक्यता

Reason, Don't Sleep on stomach, health article

मुंबई, ०४ मार्च: आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचं आहे. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची सवयीनुसार झोपण्याची पद्धत असते. (Reason why you should not sleep on your stomach health article)

कारण, पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला देखील पोटावर जोर देऊन झोपण्याची सवय असेल तर आजच बदला.

  • सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम:
    पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखीचा, मान दुखणं आणि पाठदुखीची वेदना सुरू होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्‍या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो.
  • मानेमध्ये वेदना:
    पोटावर झोपेमुळे मानदुखी होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही.
  • डोक्यात तीव्र वेदना:
    पोटावर जोर देऊन झोपल्याने डोकेदुखी होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही आणि मग डोकेदुखी सुरू होते. डोक्यामध्ये एक प्रकारे रिक्तपणा आणि तणाव निर्माण होतो. यामुळे डोके जड होते. तर काही जणांना मळमळ होण्याचाही त्रास होतो.

 

News English Summary: Getting enough sleep is essential for your whole body to function properly. You need at least eight hours of sleep to stay healthy. This helps in maintaining good physical and mental health. Getting proper sleep is just as important as getting a good night’s sleep. Everyone has a habitual sleeping pattern.

News English Title: Reason why you should not sleep on your stomach health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या