25 November 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांना किंमत चुकवावी लागतेय - शिवसेना

Income Tax Department, Taapsee Pannu, Anurag Kashyap, Saamana Editorial

मुंबई, ०५ मार्च: आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र दुसरीकडे आयकर विभागाच्या कारवाईवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारला घेरले आहे. “केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत असं सामाना’मध्ये म्हटलं आहे.

हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा. सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

News English Summary: The Income-tax department on Wednesday raided the homes and offices of four Bollywood celebrities in Mumbai and Pune. Actress Tapsi Pannu, producer Anurag Kashyap, Vikas Behl and Madhu Montana are the four celebrities on the radar of the Income Tax Department. The operation started for the second day in a row. It is said that the action will continue for the next two to three days.

News English Title: Income Tax Department It Raid Taapsee Pannu Anurag Kashyap Shivsena Attack Modi Govt through Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)#Saamana(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x