22 November 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे? | महिलांसाठी अधिक घातक

Shortage of Haemoglobin, blood, women's health

अॅनिमिया (पंडुरोग किंवा रक्तक्षय) म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होणे. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. शरीरातील इतर सर्व पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि पर्यायाने अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. मासिकपाळीचा त्रास, प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास स्त्रियांच्या शरीरात रक्ताची, आयर्नची कमतरता जाणवते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवरही होतो. अशावेळेस औषधोपचारासोबतच आहाराच्या पथ्यपाण्यामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला हिमोग्लोबिन आणि रक्ताची पातळी वाढायला मदत होते. (Shortage of Haemoglobin in blood is serious issue for woman’s health article)

शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरात योग्य रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असणं ही अत्यंत धोकादायक आहे. म्हणून योग्य आहार घेणं तितकचं महत्त्वाचं आहे.

एनीमीया (पंडुरोग किंवा रक्तक्षय):
एनीमीया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजन आणि रक्ताची आवश्यकता असते. ऑक्सिजन आणि रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिनचे असते.

गर्भवती महिलांसाठी हानिकारक (Dangerous for Pregnant Woman’s):
गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिन घटकांचा अभाव शारीरिक दुर्बलता वाढवते. त्याचप्रमाणे याचा बाळावरही वाईट परिणाम होतो.

ब्‍लड प्रेशरची समस्‍या (Blood Pressure Issue)
हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. शरीरात हिमोग्लाबिनची कमतरता असल्यास आहारात केवळ आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे पुरेसे नाही. आहारातील आयर्न घटक रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. याकरिता किवी, पपई, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू अशा पदार्थांचा मुबलक समावेश करणं आवश्यक आहे.

 

News English Summary: Anemia is a decrease in red blood cells or haemoglobin. This reduces the ability of the blood to carry oxygen. The oxygen supply to all the other cells in the body is reduced and, alternatively, the function of the organs is adversely affected.

News English Title: Shortage of Haemoglobin in blood is serious issue for women’s health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x