22 November 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा

Pimpri Chinchwad Municipal Corporation, Deputy Mayor Keshav Gholave, ​​resigned

पिंपरी, ०६ मार्च: राज्यातील महत्वाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारणाने अचानक वेग धरला आहे. कारण महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी काल (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. केशव घोळवे यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘वैयक्तिक कारणावरुन आपण राजीनामा दिला आहे’ असे सांगितले. त्यामुळे घोळवे यांनी राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे जरी सांगितले असले तरी, नेमके कारण काय याबाबत उत्सुकता कायम आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave ​​resigned yesterday)

अत्यंत महत्वाच्या पिंपरी चिंचवड शहरावर सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. सहा नोव्हेंबर या दिवशी भारतीय जनता पक्षाने महापौर पदाची केशव घोळवे यांच्या नावाची घोषणा करत त्यांची निवड केली. महत्त्वाचे असे की घोळवे ज्या पदावर उपमहापौर म्हणून आले त्याच पदावर असलेल्या तत्पूर्वीचे उपमहापौर तुषार हिंगे यांना भारतीय जनता पक्षाने डच्चू दिला होता. तुषार हिंगे यांचा पक्षाने मुदतीपूर्वीच राजीनामा घेतला होता.

केशव घोळवे हे एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. ते उसतोड कामगाराच्या कुटुंबातून येतात. त्यांच्या संघर्षाकडे पाहून पक्षाने त्यांना महापौर केले. परंतु, आता मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या चारच महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

 

News English Summary: Politics has suddenly picked up speed in the important Pimpri Chinchwad Municipal Corporation in the state. Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave ​​resigned yesterday (Friday, February 5). His resignation has sparked a heated debate in the political circles of Pimpri-Chinchwad. However, Keshav Gholave ​​while talking to the media said that he has resigned due to personal reasons. Although Gholave ​​said the reason for his resignation was personal, there is still curiosity as to the exact reason.

News English Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave ​​resigned yesterday news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x