भाजप काळात रुजू झालेल्या प्रदीप शर्मांसाठी प्रचार | पण सचिन वझेंना लक्ष? - सविस्तर वृत्त
मुंबई, ०६ मार्च: मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंब्रातील रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव देखील घेण्याचे प्रकार सुरु आहेत. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ही शंका उपस्थित केली आहे.
विरोधकांकडून ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात असतानाच वाझे यांचं नाव घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सरकारला सवाल केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सरकारला सवाल केले आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?,” असे सवाल देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
विरोधकांमध्ये भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या पक्षात २०१४ पासून कोणतीही गोष्ट सहज घडत नाही. येथे सर्व सुनिश्चित करून विषय उचलले जातात आणि संशय कल्लोळ निर्माण केले जात आहेत. त्यात पोलीस नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. मुंबई किंवा ठाणे पोलीस सोडा येथे जळगाव पोलीस देखील सुटलेले नाहीत. सुशांत सिंग राजपूत, कंगना रानौत ते इतर प्रकरणांपासून ते असे प्रकार सुरूच आहेत. आजही अनेक भाजप नेते सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून ट्विट करत असतात पण तोच तपास CBI ने देखील केला आहे आणि त्यातून काय निष्पन्नं झालं याची आठवण सामान्यांना करून देत नाहीत. नेमका तोच संशय कल्लोळ निर्माण करण्याचा प्रकार टीआरपी घोटाळा उघड करणाऱ्या सचिन वझे या पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीतही भाजप नेते करताना दिसत आहेत. कारण त्याच चौकशीत मोदी सरकारची मोदी पोलखोल झाली आहे हे वास्तव आहे.
दुसरं म्हणजे संशय कल्लोळ केवळ सचिन वझे यांच्याबाबतीत निर्माण केला जातं आहे, कारण राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर सचिन वझे यांना पुन्हा पोलीस खात्यात घेण्यात आलं. आता दुसरं उदाहरण घ्या ज्याकडे पूर्ण डोळेझाक केली जातं आहे, कारण विषय आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील असंच म्हणता येईल.
सध्या पोलीस खात्यातून राजीनामा दिलेले चकमक फेम प्रदीप शर्मा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर या चर्चांना तीन वर्षांपूर्वी उधाण आले होते. त्यातच 2014 मध्ये पश्चिम उपनगरातील भाजपच्या अभियान या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे या चर्चेला आणखी बळकटी मिळाली होती, त्यावेळी अंधेरी पूर्व येथून ते निवडणूक लढवण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातून झालेल्या मोठ्या पोस्टरबाजीमुळे, प्रसिद्धी माध्यमांचेही लक्ष वेधले होते. या सर्व पार्श्वभूमिनंतर शर्मा पुन्हा पोलिस दलात रुजू झाले आहेत, हा निव्वळ योगायोग मानायला राजकीय पंडित तयार नव्हते.
नव्वदच्या दशकात मुंबईत गॅंगवॉर उफाळून आले होते, त्यावेळी अंडरवर्ल्ड के लोहे को लोहे से काटने के लिए, 1983 च्या बॅचच्या अनेक अधिका-यांना महत्त्वाच्या जबाबदा-या देण्यात आल्या. विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा एकापेक्षा एक सरस अधिका-यांमुळे गुन्हे शाखेला सोन्याचे दिवस आले. मुंबईत दिवसाला अंडरवर्ल्डच्या शूट आऊटमध्ये एकाच तरी मृत्यू व्हायचा, अशा काळात या 1983 च्या बॅचने अंडरवर्ल्डमध्ये पोलिसांची दहशत प्रस्थापित केली होती.
प्रदीप शर्मा यांनी त्यावेळी एके 47 चा वितरक सुभाष मकडावालाचा एन्काऊंटर केला. तो शर्मा यांचा पहिला एन्कांउंटर होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 2004 मध्ये शर्मा यांनी गुन्हे शाखेच्या कांदीवली कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. तेथेच त्यांच्यावरील आरोपांच्या मालिकेला सुरूवात झाली.
अमरावती येथे तैनात असताना राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या याच्या बनावट एन्काऊंटर आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपातून शर्मा यांना सन 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. बनावट लख्खन भैयाच्या एनकाऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली. पुढे 31 ऑगस्ट 2008 ला गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शर्मा यांना बडतर्फ करण्यात आले.
पोलिस महासंचालकांच्या या निर्णयाविरोधात अखेर शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी राधाकृष्णन व ए.पी. सिन्ही यांच्या खंडपीठाने शर्मा यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगून त्यांची बडतर्फी 7 मे 2009 मध्ये रद्द ठरवली व शर्मा यांना पुन्हा खात्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र 2013 मध्ये लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी मुंबई न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. त्यावेळी ख-या अर्थाने शर्मा यांच्या पोलिस दलातील परतीचा मार्ग मोकळा झाला. चकमकीचे शतक पूर्ण करणारे चमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा नऊ वर्षांनंतर पुन्हा 16 ऑगस्ट 2017 ला महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले.
त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी थेट राजकरणात प्रवेश आणि ते भाजपमध्ये जातील असे तर्क जोडले जातं असताना त्यांनी मातोश्रीवर अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अंधेरी पूर्वेतून ते विधानसभा लढवतील अशी अटकळ बांधली जातं असताना अंधेरी पूर्वेतील शिवसेनेच्या राजकारणामुळे त्यांना नालासोपाराचं तिकीट देण्यात आलं होतं. मात्र एक त्यानंतर स्वतः भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या प्रचारासाठी नालासोपाऱ्यात हजेरी लावली होती. त्यात विशेष उपस्थिती होती ती भाजपचे खासदार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांची याचा भाजपाला विसर पडला असावा. जर प्रदीप शर्मा इतके विवादित होते तर भाजप त्यांच्या विसजयासाठी इतकं मेहनत का घेतं होतं? कारण ते त्यांच्या सोयीचे असावेत आणि सचिन वझे नसावेत असंच म्हणावं लागेल.
Did election campaigning in Mumbai & especially in Nalasopara constituency, Palghar for the alliance candidate Pradeep Sharma Ji.
Experienced the passionate zeal among thousands of people who want a positive change in area for ending the ‘local’ 370 and goonda tax. pic.twitter.com/wUH20kS33o
— Dr. Satya Pal Singh (@dr_satyapal) October 14, 2019
News English Summary: The death of Mansukh Hiren has heated up politics in the state. Hiren’s body was found at Retibandar in Mumbra. After that, the names of police officer Sachin Waze have also been mentioned in the case. The BJP has now raised the question of what Waze Hiren, who is not part of the Thane police or the ATS, was doing at the place of Hiren’s autopsy. BJP leader Ashish Shelar has raised this suspicion.
News English Title: BJP politics against Sachin Vaze after death of Manasukh Hiren news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार