20 April 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

देव माणसं | लग्नाच्या ६ महिन्यात नवऱ्याचा मृत्यू | सासू-सासऱ्यांचा सूनेच्या पुनर्विवाह्यासाठी पुढाकार

Mother in laws, Initiative, Remarriage, Daughter in law

बुलढाणा, ०८ मार्च: आपल्या आजूबाजूला सूनेचा वेगवेगळ्या कारणांसाठी छळ होतानाच्या घटना घडत असतात. पण शालिग्राम आणि वस्तलाबाई वानखेडे यांनी विधवा सूनेचा सांभाळ करत तिचा विवाह लावून दिल्याने त्यांच्या कार्याचे संपुर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालूक्यातील सूनगाव या गावात सूनेच्या लग्नाचा अनोखा सोहळा पार पडला. (Mother in laws took initiative for remarriage of daughter in law)

गावातील वस्तलाबाई यांचा मुलगा संतोष याचा विवाह वर्षभरापुर्वी राधा उमाळे या मुलीशी झाला होता. लग्नानंतर दोघे सूखाने संसार करत होते. अशातच दोघांच्या संसाराला कुणाचीतरी नजर लागली आणि लग्नाच्या ५ महिन्यानंतर संतोषचा मृत्यू झाला. सासूने विधवा सुनेच्या भविष्याचा विचार करत तिचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले आहे. एवढेच नाही तर पोटच्या पोरी सारखे तिचे कन्यादान करून तिची पाठवणी केली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या लग्नाची चर्चा सुरू आहे. (Santosh, the son of Vastalabai from the village, was married to Radha Umale a year ago)

नवऱ्याच्या मृत्यूनंतर राधा पुर्णपणे खचून गेली होती. तिचे दु:ख सासू वस्तलाबाई आणि सासरे शालिग्राम वानखेडे यांना पाहावत नव्हते. मुलगा सोडून गेल्याचं दु:ख बाजूला ठेवत त्यांनी सूनेचा आपल्या मुलीसारखा सांभाळ केला. आयुष्यात ती नेहमी आनंदी राहावी यासाठी त्यांनी तिचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. सासूसासऱ्यांनी सूनेसाठी नवरदेव शोधायला सूरूवात केली आणि सूनेचा विवाह त्यांनी खेरडा येथील प्रशांत राजनकार या तरूणाशी लावून दिला. सगळ्यात आदर्शाची बाब म्हणजे सासूसासऱ्यांनी सूनेचे कन्यादान केले आहे.

 

News English Summary: There are cases of gold being harassed around us for various reasons. But the work of Shaligram and Vastalabai Wankhede taking care of the widowed daughter-in-law and arranging her marriage is being appreciated in the entire district. A unique wedding ceremony was held at Sungaon in Jalgaon Jamod taluka of Buldhana district.

News English Title: Mother in laws took initiative for remarriage of daughter in law news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या