24 November 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

बँक घोटाळे, बुडीत कर्जांचं ओझं | देशात बँकांवरील संकट वाढतंय - फिच रेटिंग रिपोर्ट

Indian Banking sector, Fitch Rating report, NPA, Bad Debts

मुंबई, ०९ मार्च: व्यापारी बँकांकडून मोठे उद्योग व पायाभूत सुविधांसाठी होणाऱ्या पतपुरवठ्यात घट झाल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. देशातील मोठ्या उद्योगांना कर्ज देण्यास बँका तयार नसल्याचे निरीक्षण नोंदवताना बँकांच्या गृहकर्ज पतपुरवठय़ात वाढ ही पोलाद, सिमेंट, उर्जा निर्मिती आणि अन्य पायाभूत सुविधा विकास यासारख्या क्षेत्रांना होणाऱ्या पतपुरवठय़ावर विपरीत परिणाम करत असल्याबद्दलही मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त केली होती.

मोठ्या उद्योगांमधील वाढत्या अनुत्पादित कर्जामुळे व्यापारी बँका या उद्योगांना कर्जवाटप करत नसल्याचा प्रश्न साथीच्या आजारामुळे आणखी वाढत गेल्याचे रिझर्व्ह बँकेने अहवालात म्हटलं होतं. साहजिकच मोठे उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या पतपुरवठ्यातील घट हे चिंतेचे कारण बनले आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र अजून एक चिंता वाढविणारा विषय समोर आला आहे.

कारण देशातील मोठे बँक घोटाळे आणि बुडलेल्या कर्जांच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. यामुळे भविष्यात बँकांवरील संकट वाढत आहे. फिच रेटिंगने सोमवारी सांगितले की, आधीपासूनच अडचणींतून जाणाऱ्या आर्थिक क्षेत्राला लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मोठा धक्का बसला आहे. तसेच फिचनुसार ही सुधारणा म्हणजे सध्याच्या दबावाच्या स्थितीवरील एक मुखवटा आहे. प्रत्यक्षात मात्र, परिस्थिती वेगळी आहे. भविष्यात बँकांवरील या दबावाचा दुष्परिणाम आणि कोरोना महामारीमुळे छोटे उद्योजक मेटाकुटीला येणार आहेत. यामुळे बेरोजगारी देखील वाढणार आहे. आरबीआयने देखील जानेवारीमध्ये इशारा दिला होता. सर्वाधिक दबावातील स्थितीमध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रातील बॅड लोन दुप्पट म्हणजेच 14.8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार सरकारने 2021-22 मध्ये सरकारी बँकांमध्ये 5.5 अब्ज डॉलरचा निधी ओतण्याचा निर्णय घेतला आहे, जो अपुरा आहे. बँकिंग क्षेत्राला दबावापासून वर काढण्यासाठी 15 ते 58 अब्ज डॉलरची गरज भासणार आहे. फिचनुसार 2021-22 मध्ये सरकारी बँकांपेक्षा खासगी बँकांमध्ये जास्त चांगली वाढ पहायला मिळणार आहे.

 

News English Summary: The impact of the Covid-19 pandemic is likely to pose challenges to Indian banks’ improving financial performance once asset-quality risks manifest in the financial year ending March 2022 says Fitch Rating report.

News English Title: Indian Banking sector ending March 2022 says Fitch Rating report news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x