26 November 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग दाखल | तर अशोक चव्हाणांविरुद्ध सुद्धा हक्कभंग आणणार

Anil Deshmukh, Serious allegations, Devendra Fadnavis, Anvay Naik suicide case

मुंबई, १० मार्च: मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढले जाणार असल्याची घोषणा केली. ते विधान परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल. (Anil Deshmukh had made serious allegations against Devendra Fadnavis in the Anvay Naik suicide case)

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.

याप्रकरणावर बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की. अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केले नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबले असे म्हणणे चुकीचे आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सांगतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has moved a motion against Home Minister Anil Deshmukh. Anil Deshmukh had made serious allegations against the then Chief Minister Devendra Fadnavis in the Naik suicide case in the Assembly yesterday. Anil Deshmukh had alleged that Devendra Fadnavis had suppressed Naik’s suicide case.

News English Title: Anil Deshmukh had made serious allegations against Devendra Fadnavis in the Anvay Naik suicide case news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x