22 November 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

TRP घोटाळा उघड करून त्यांनी माध्यमांचं हित जपलं | माध्यमांनी त्यांनाच लक्ष केलं - सविस्तर वृत्त

TRP scam investigation, Sachin Vaze, Devendra Fadnavis

मुंबई, १० मार्च: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांचा स्कॉर्पिओ प्रकरणाशी सचिन वाझे यांचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. सध्या ठाकरे सरकारला लक्ष करण्यासाठी भाजप नेते कोणताच वापर कोणत्या थराला जाऊन करतील याची शास्वती देता येणार नाही. कारण ठाकरे सरकारला नाकारात्मक विषयावरून चर्चेत ठेवणं हाच भाजपाचा एकमात्र कार्यक्रम झाला आहे.

त्यासाठी ते सुशांतसिंग राजपूत पासून ते कंगना रानौत अशा कोणाचाही उपयोग करून घेतील. सध्या तसाच वापर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबतीत होताना दिसत आहे. मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो,” असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. मात्र विधानसभेत फडणवीसांनी नेमकं याच्या विरुद्ध सांगितल्याचं महाराष्ट्राने पहिले आहे.

सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात ‘टेक्नो-सॅव्ही’ अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती. वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्याच अनुभवाचा भाग म्हणजे त्यांनी सध्याचा तंत्रज्ञानाशी संबंधित TRP घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे देशभरात एक टीव्ही वृत्तवाहिनी इतर स्पर्धक वृत्तवाहिन्यांचा हक्काचा महसूल कशी डिजिटली पळवत होती ते देशाला आणि स्वतः माध्यमांना देखील कळलं. यामध्ये सर्वाधिक नाचक्की झाली ती सत्ताधारी भाजपाची हे देखील टीआरपी घोटाळ्यातील आरोपीच्या व्हाट्सअँप चाट’मधून हे सर्वांनी पाहिलं आहे.

वाझेंनी अंडरवर्ल्डच्या अनेकांना त्यांनी यमसदनी धाडलं आणि गुन्हेगारांवर देखील वचक ठेवला होता. मात्र अनेकांना माहित नाहीत की पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली होती.

सचिन वाझे यांनी पोलिस दलातून निलंबित झाल्यानंतर तीन वर्षांनी 2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा राजीनामा दिला. पण, सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. राजीनामा दिल्यानंतर एका वर्षात सचिन वाझे यांनी 2008 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.

मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता हाच मुळात भाजपच्या पोटदुखीचा विषय होता आणि त्याच मुद्याला कुरवाळून फडणवीसांनी शिवसेनेला लक्ष केलं. वास्तविक त्यांनी सेनेत प्रवेश केला होता यात नेमका गुन्हा काय हे देखील त्यांनी स्पष्ट केलं नाही. कारण भाजपमध्ये तर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी देखील प्रवेश केला आहे. तसेच ज्यांच्या हाताखाली सचिन वाझेंनी काम केलं ते प्रदीप शर्मा देखील सध्या सक्रिय राजकारणात आहेत. त्याच प्रदीप शर्मांसाठी भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी प्रचार केला होता. टीआरपी घोटाळा करणाऱ्यांना घेरून प्रश्न विचारण्याचं धाडस माध्यमांनी केलं नसलं तरी ज्या अधिकाऱ्याने तो उघडकीस आणला त्यांना ते जागोजागी घरात आहेत. त्याला कारण काय तर भाजपने केलेले आरोप असंच म्हणता येईल.

वास्तविक TRP घोटाळा हे देखील एक हायप्रोफाईल प्रकरण मानता येईल. मात्र त्यानंतर देखील थेट न्यायालयापर्यंत सर्वकाही ठोस पुराव्यांसहित विषय घेऊन जाणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या राजकीय विरोधकांच्या आरोपांच्या हवेतील गोळीबाराचे बळी ठरत आहेत. प्रत्येक अधिकारी एवढं धाडस करेलच असं नाही, मात्र सचिन वाझेंनी याप्रकरणात ते केलं हे मान्य करावं लागेल. राजकीय कुस्तीच्या नादात भारतीय प्रसार माध्यमांनी आपल्याच क्षेत्राला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामी आलेल्या अधिकाऱ्याला बेछूट आरोपानंतर फैलावर घेतलं आहे. यामागे टीआरपी घोटाळा कमकुवत करण्याचं षडयंत्र तर नाही ना याचा विचार माध्यमांनी देखील करायला हवा आणि चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहायला हवं असं अनेक पत्रकारांनी देखील म्हटलं आहे.

 

News English Summary: The question arises as to whether Sachin Waze has anything to do with the Scorpio case of explosives found outside Mukesh Ambani’s house. At present, there is no guarantee that the BJP leaders will use any means to attract the attention of the Thackeray government. Because the only program of the BJP is to keep the Thackeray government in the discussion on negative issues.

News English Title: TRP scam investigation officer Sachin Vaze target by media after Devendra Fadnavis allegations news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x