23 November 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

नाणार प्रकल्पाचं आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, MNS chief Raj Thackeray, Nanar Refinery project

मुंबई, ११ मार्च: राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपली. यात मनसुख हिरेन प्रकरण प्रचंड गाजले. यात क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वाझे हे नाव प्रकर्षाने समोर आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याच दरम्यान त्यांनी कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पुढे आल्याने त्यावर देखील भाष्य केलं आहे. (CM Uddhav Thackeray talked on MNS chief Raj Thackeray support to Nanar Refinery project)

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यानेच तेथून प्रकल्प हटविण्यात आला असून, त्या ठिकाणी रिफायनरी न करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. आम्हाला वाटते म्हणून एखाद्या उद्योगाला विरोध किंवा पाठिंबा देत नाही. यापूर्वी स्थानिकांचा विरोध असल्यामुळेच आम्ही तेथून प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला होता. असं म्हणत आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. तसेच रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. मात्र, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नोटबंदी ते कोरोना या सर्व घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत. आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. मात्र, अशा प्रकल्पातून तयार होणारा रोजगार स्थानिकांच्या आणि मराठी माणसांना मिळायला हवा. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते

 

News English Summary: The project has been canceled due to locals’ opposition to the Nanar project and a decision has already been taken not to set up a refinery there. We do not oppose or support an industry as we think. We had earlier decided to move the project from there due to local opposition. Saying this, if anyone wants to be welcomed now, they can do it, said Uddhav Thackeray. Also, the refinery will be given another alternative space instead of Nana. However, Uddhav Thackeray has said that this project will not be allowed to go out of the state.

News English Title: CM Uddhav Thackeray talked on MNS chief Raj Thackeray support to Nanar Refinery project news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x