21 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

काल अधिवेशन संपताच आज फडणवीस आणि चंद्रकांतदादा RSS मुख्यालयात | दरवाजाआड बैठक

Fadnavis, Chandrakant Patil, RSS, Mohan Bhagwat, Sachin Vaze

नागपूर, ११ मार्च: अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या केंद्रस्थानी टीआरपी घोटाळा उघड करणारे सचिन वाझे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याला कारण ठरलं आहे हसमुख हिरेन मृत्यू प्रकरण. अधिवेशन कालच संपले आणि भाजप-आरएसएस’मध्ये बैठका सुरु झाल्याने सर्वकाही ठरवून झालं होतं का अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण सामान्यांशी निगडित मुद्दे केवळ नावाला लावून धरण्यात आले तर सचिन वाझेंना विशेष लक्ष करून विषय उचलून धरण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान आजच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील नागपुरात दाखल होताच सकाळी विमानतळावरून थेट संघाच्या मुख्यालयात पोहोचले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान शिवसेनेने देखील फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. लोकांच्या जगण्या मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे.’ असे म्हणत शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गदारोळावरुन सामना अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

अर्णब गोस्वामी याने केलेल्या छळामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली व हे प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने दाबले होते. या प्रकरणाची फाईल सचिन वाझे यांनी उघडली व अर्णब गोस्वामी यास तुरुंगात टाकले. अर्णब गोस्वामी याने ‘टीआरपी’ घोटाळा करून सगळय़ांचीच फसवणूक केली. या टीआरपी घोटाळय़ाचा तपासही वाझे हेच करीत आहेत. अर्णब गोस्वामी यास आत्महत्या, टीआरपी घोटाळय़ात जाबजबाब द्यावा लागेल, सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून वाझे यांच्या विरोधात विरोधी पक्ष आदळआपट करीत आहे काय?

 

News English Summary: Meanwhile, Devendra Fadnavis and Chandrakant Patil arrived in Nagpur today and reached the team headquarters directly from the airport in the morning. Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Bhaiyaji Joshi and Mohan Bhagwat had a closed door discussion for an hour and a half. The meeting was kept top secret. Exactly what was discussed at the meeting was not disclosed.

News English Title: Fadnavis and Chandrakant Patil meet RSS chief Mohan Bhagwat in Nagpur news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x