22 November 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Health First | वजन कमी करायचंय | लिंबू-गुळाचा आयुर्वेदिक काढा

ayurvedic drink, jaggery and lemon, Health Article

मुंबई, १२ मार्च: एकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचाली नसणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काही जण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते.

आयुर्वेदिक पेय तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ गूळ आणि लिंबू या दोन सामग्री आवश्यक आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये गूळ आणि लिंबू असतेच. या पेयामुळे तुमच्या शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. चयापचयाची प्रक्रिया योग्य पद्धतीनं पार पडल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वाढलेले पोट कमी होण्यास मदत मिळेल. (Ayurvedic drink is Jaggery and lemon juice for  weight loss health article)

दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात. या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.

या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कसे करते काम:

  1. गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  2. लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.
  3. गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.

कसा बनवायचा काढा:
एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता.

 

News English Summary: All you need to make an Ayurvedic drink is Jaggery and lemon. Everyone has Jaggery and lemon in their kitchen. This drink provides your body with nutrients. Consumption of Jaggery after a meal increases the body’s metabolic capacity. Proper metabolism will help reduce excess body fat and bloated stomach.

News English Title: Ayurvedic drink is Jaggery and lemon juice for  weight loss health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x