22 November 2024 7:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सचिन वाझेंकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल | मनसुख प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न होण्याची शंका?

API Sachin Vaze, Mansukh Hiren case, Mumbai Police

मुंबई, १३ मार्च: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षाच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 10 मार्च रोजी सभागृहातून घोषणा केली होती की वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आले. त्यानंतर 12 मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून स्पेशल ब्रांचला बदली करण्यात आली होती. (Mumbai police API Sachin Vaze has filed a bail application to avoid arrest in Mansukh Hiren case)

आता मनसुख हिरेन प्रकरणी अटक होऊ नये यासाठी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. कोर्टाने हा अर्ज स्वीकारून सुनावणीसाठी 19 मार्चची तारीख दिली आहे.

नेमके काय आरोप आहेत ?
25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटके सापडली त्याचा मालक मनसुख हिरेनचा 5 मार्च रोजी मृतदेह सापडला. मनसुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या ATS करत आहे. मनसुखच्या पत्नी विमला यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले होते. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विमला यांचा जबाब सभागृहात वाचून दाखवला. त्या जबाबात मनसुख हिरेनची हत्या कथितरित्या वाझे यांनी केल्याचा थेट आरोप करण्यात आला. यानंतरच गृहमंत्र्यांनी सभागृहात वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. स्कॉर्पिओ सापडल्याच्या एका आठवड्यानंतर मनसुखचा मृतदेह सापडला. तो मनसुखच्या घरापासून 7 किमी दूर होता. मनसुख यांच्या पत्नीने हेदेखील आरोप केले होते, की गेल्या 4 महिन्यांपासून वाझेच त्यांच्या पतीची स्कॉर्पिओ कार वापरत आहेत.

 

News English Summary: Assistant Inspector of Police Sachin Waze, who is in the limelight in the Mansukh Hiren murder case, has filed a bail application to avoid arrest. Home Minister Anil Deshmukh had announced in the House on March 10 that Vaze had been removed from the Crime Branch following pressure from the Opposition. He was then transferred from the Crime Branch to the Special Branch late at night on March 12.

News English Title: Mumbai police API Sachin Vaze has filed a bail application to avoid arrest in Mansukh Hiren case news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x