22 November 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सर्वपक्षीय शिष्टमंडळ बेळगावला पाठवा | अन्यथा असंख्य मराठी माणसे तेथे धडकतील - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Karnataka Maharashtra border, Belgaum dispute

मुंबई, १३ मार्च: बेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच थेट इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल संजय राउत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut warn Karnataka government over Karnataka Maharashtra border dispute)

राउत पुढे बोलताना म्हणाले, बेळगावात मराठी माणसांसह शिवसेनेच्या कार्यलयांवर सुद्धा हल्ले होत आहेत. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंता व्यक्त करतात. पण, जेव्हा बेळगावात मराठी माणसांवर हल्ले होतात, तेव्हा मात्र पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा काहीच बोलत नाहीत.

बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले हा एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा केवळ सरकारचा विषय नाही. यात केंद्र सरकारचा दोष दिसून येत आहे. एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठवायला हवे. असे नाही केल्यास सांगली आणि कोल्हापूरातील असंख्य नागरिकच बेळगावात शिरणार. बेळगाव हा देशातला भाग आहे की नाही? आम्ही मराठी माणसे जेव्हा तिकडे जायचे बोलतो तेव्हा आम्हाला बंदूका दाखवल्या जातात. मी बेळगावला जाऊ शकतो. आमच्याकडे सुद्धा बंदूका आहेत असा इशारा देखील राउत यांनी दिला आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has given his own direct warning to the Karnataka government as the Karnataka-Maharashtra border dispute flares up again in Belgaum. Marathi people are being tortured in Belgaum. If no one pays attention to these atrocities, then the Maharashtra government will have to come to Belgaum with full force. Don’t go to Delhi crying if your head hurts. The central government is responsible for the situation in Karnataka, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut warn Karnataka government over Karnataka Maharashtra border dispute news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x