22 November 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे | या आजारांवर रामबाण उपाय

Eating Curd, benefits, summer season, health article

मुंबई, १३ मार्च: प्राचिन मान्यता आहे की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर दही खाल्ल्याने त्या कामात यश मिळते. यासोबतच दही आरोग्यासाठीही चांगले असते. यामध्ये काही असे रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे दुधापेक्षा लवकर पचते. ज्या लोकांना अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्या आहेत त्यांना दह्यापासुन तयार केलेले पदार्थ जसे की, लस्सी, ताक यांचा उपयोग अधीक करावा. हे खाल्ल्याने डायजेशन योग्य प्रकारे होते आणि भूक लागते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखे पोषकतत्त्व असतात. दात आणि हाडांना मजबूत बनवणा-या कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते. (Eating Curd benefits in summer season health article)

दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते.

अनिद्रा:
रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे. यामुळे ही समस्या हळुहळू दूर होईल.

पचनशक्ति वाढवते:
दहीचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले गेले आहे. हे रक्तातील कमतरता आणि अशक्तपणा दूर करते. दूध जेव्हा दहीचे रुप घेते तेव्हा दूधातील शर्करा आम्लाचे रुप घेते. यामुळे पचनक्रियेत मदत मिळते. ज्या लोकांना खुप कमी भूक लागते त्यांना दहीचा खुप फायदा होतो.

इम्यूनिटी मजबूत होते:
शरीराचे पाचन तंत्र विशेषत: आतड्यातमध्ये आजार पसरविणारे जीवाणू नष्ट करून आतडे चांगले ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन आणि प्रथिनेमध्ये दहीमध्ये लैक्टोबॅकिलस असते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते रोग प्रतिरोध (Immunity) मजबूत करते. ऑस्ट्रियामध्ये झालेल्या एका अभ्यासात पुढे आले आहे की, शरीरासाठी 200 ग्रॅम दही खाण्याचे फायदे खूप आहेत. जे औषधानेही मिळत नाहीत.

रक्तदाब नियंत्रण दही:
दही रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधन लक्षात घेता, दररोज दही खाल्ल्याने हायपरटेन्शनची समस्या कमी होण्यास मदत होते. मात्र, बिना फॅटचे दही खा.

हाडे मजबूत होतात:
दहीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी यासारख्या पोषक घटक आहेत, ज्यामुळे हाडाना लागणारी खनिजे दह्यातून मिळतात. हाडे मजबूत होता.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशी:
दहीमध्ये एक लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. तसेच, उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचेवर परिमाण होत असतो. चेहऱ्यासाठी दही उपयुक्त आहे. दहीमध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यास उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण होते. त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा साफ होते. तसेच, केसांमधील डान्ड्रफची समस्या काढून टाकण्यात दही देखील उपयुक्त आहे.

 

News English Summary: Curd contains many nutrients. Eating Curd every day not only makes you feel refreshed, but also keeps your digestive system healthy and does not cause stomach upset. Curd is beneficial in many ways for osteoporosis, blood pressure, hair and bones. Curd is rich in protein, calcium, riboflavin, vitamin B6 and vitamin B12.

News English Title: Eating Curd benefits in summer season health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x