22 November 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

वाझेंच्या चौकशीत NIA'चा फौजफाटा | तर पुलवामा चार्जशीट दाखल करताना केवळ एक व्यक्ती होती

NIA team, Sachin Vaze, Pulawama

मुंबई, १५ मार्च: मनसुख हिरेन यांच्या हत्येवरुन सध्या राज्यातील राकारण चांगलंच तापलं आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

सचिन वाझे यांच्या प्रकरणात NIA मोठी टीम काम करत असून मोठ्या प्रमाणावर कुमक पुरविण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी NIA टीमची मोठी कुमक सोबत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एकूण चौकशी सुपरसॉनिक वेगाने होताना दिसत आहे.

NIA ने केवळ २ दिवसात केलेल्या जलद कारवाईनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना लक्ष केलं आहे. कारण पुलावामातील भ्याड हल्ल्यात शेकडो किलोचा RDX वापरला गेला होता आणि त्यात सीआरपीएफ तब्बल ४० जवान शहीद झाले होते. मात्र याच गंभीर प्रकरणात न्यायालयात केवळ आरोप पत्र दाखल होण्यास तब्बल वर्ष उजाडलं होतं. त्यातही पुढे नेमकं काय झालं याचा थांगपत्ता नाही. विशेष म्हणजे मुंबईत फौजफाटा घेऊन फिरणारे NIA अधिकारी जेव्हा पुलावामातील हल्ल्यासंदर्भात चार्जशीट न्यायालयात फाईल करण्यास गेले होते त्यावेळी एक व्यक्ती उपस्थित होती. त्यामुळे गरजेनुसार आणि सोयीनुसार रसद पुरवली जाते का अशी शंका व्यक्त होतं आहे.

 

News English Summary: Authorities opposed the protest with all available police forces, special services and the army. ” Hundreds of kilos of RDX were used in the cowardly attack in Pulawama and 40 CRPF personnel were killed in it. However, in this serious case, only a charge sheet was filed in the court.

News English Title: Big NIA team with Sachin Vaze everywhere during investigation news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x