22 November 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भविष्यात नरेंद्र मोदींची देवाप्रमाणे पूजा केली जाईल | उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Prime Minister Narendra Modi, Worshipped as God, Chief Minister Rawat

डेहराडून, १५ मार्च: उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत हे हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मोदींवर स्तुतीसुमनं उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. यावेळी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्यांशी केली आहे. रविवारी हरिद्वारमध्ये नेत्र कुंभाची सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींचं तोंड भरुन कौतुक केलं. (Prime Minister Narendra Modi will be worshipped as God in the coming period said Chief Minister Rawat)

आज अनेक मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात असंही रावत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. ज्या पद्धतीने त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, असं रावत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे येण्याऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल, असंही आपल्या भाषणात रावत म्हणाले.

तत्पूर्वी हिमाचल प्रदेशात महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे धक्कादायक विधान केले होते.

मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला असंही भारद्वाज म्हणाले होते. मोदी हे भगवान शंकाराचे रुप असल्यानेच त्यांनी देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं, असं देखील भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केल्याचं आऊटलूक इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं होते.

 

News English Summary: In the same way that in the Dwapar Yuga, Lord Rama and in the Treta Yuga, Lord Krishna gained respect and divinity in the society due to his deeds, Prime Minister Narendra Modi will be worshiped as God in the coming period, Rawat said in his speech.

News English Title: Prime Minister Narendra Modi will be worshipped as God in the coming period said Chief Minister Rawat news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x