Health First | प्रवासात आणि ऑफिसमध्ये ईयरफोन लावता | मग हे वाचा
मुंबई, १६ मार्च: अनेक जण ऑफिसला जाताना, प्रवासात असताना ईयरफोनवर गाणी ऐकणं पसंत करतात. अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
मोबाईल हेडफोन, इयरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय वर्तुळातून नोंदविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांतच 18 ते 30 वयोगटांतील 40 टक्के तरुणांमध्ये कानांचे आजार वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत लावून ठेवलेले हेडफोन, इयरफोन व ब्लूटूथमुळे कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्य, चिडचिड यामुळे मानसिक आजारही बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हृदयरोग आणि कर्करोग:
दररोज ईयरफोनचा वापर करणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याने हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे दररोज असं होत असल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. याशिवाय ईयरफोनमुळे कर्करोग होण्याचाही धोका संभवतो. ईयरफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हा धोका, नुकसान होण्याची शक्यता असते.
डोकेदुखी आणि झोप न येणे:
ईयरफोनमधून निघणारे रेडिएशन आणि मॅग्नेटिक इफेक्ट डोकेदुखीचा त्रास वाढवतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या रेडिएशनचे मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतात.
कमी ऐकू येणे:
ईयरफोनचा अधिक वापर कल्याने कानांवर अधिक दाब पडतो. व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबल इतकी असते. मात्र, सतत प्रमाणापेक्षा अधिक ईयरफोन वापरल्याने ऐकण्याची क्षमता ४० ते ५० इतकी होते. त्यामुळे ईयरफोनचा अतिवापर बहिरेपणा येण्याची शक्यता असते.
इन्फेक्शन:
ईयरफोन किंवा हेडफोनचा सतत वापर केल्याने इन्फेक्शनही होऊ शकते. अनेकदा लोक दुसऱ्याचे ईयरफोन वापरतात. अशामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो दुसऱ्यांचे ईयरफोन वापरणं किंवा इतरांना ईयरफोन देणं टाळावे.
News English Summary: Many people like to listen to songs on earphones while going to the office, while traveling. Many have a habit of wearing earphones while walking or exercising. But excessive use of earphones can be very dangerous for the body. Overuse of earphones can be unknowingly harmful to the body and can lead to a serious risk of serious illness.
News English Title: Earphone can cause some disease health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News