16 April 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

भाजपचे नगरसेवक संजय भोपी यांचे कोरोनामुळे निधन

BJP Panavel, corporator Sanjay Bhopi,  dies

मुंबई, १७ मार्च: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक संजय भोपी यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचे निधन झाले.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. हा एक चिंतेचा विषय बनत आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीमही सुरु आहे. पण आता संजय भोपी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पनवेल भाजपमध्ये भोपी यांचे नाव विशेष असे होते. त्यांनी भाजप पनवेल शहर उपाध्यक्षपदही सांभाळले होते. तसेच ते नगरसेवकही होते.

कोरोनाच्या काळात संजय भोपी यांनी गोरगरीब गरजूंना मदतीचा हात पुढे केला. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती सुद्धा सुधारणा झाली. परंतु त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून आजाराशी लढताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा भोपी आणि मुलगा अभिषेक त्याच बरोबर इतर कुटुंबीय आहेत.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients in the state is increasing exponentially. Various efforts are being made by the administration to prevent the spread of this virus. In addition, now BJP corporator of Panvel Municipal Corporation Sanjay Bhopi died due to corona infection.

News English Title: BJP Panavel corporator Sanjay Bhopi dies due to corona news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या