अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरण | NIA सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
मुंबई, १८ मार्च: अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात ‘कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली असून नगराळे यांनी सायंकाळी तत्काळ मुंबई पोलिस अायुक्तपदाचा पदभारही स्वीकारला.
अँटिलिया प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक वाझे यांचा हात असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनअायए) तपासात समोर अाल्यानंतर वाझे यांच्यामागे असलेल्या ‘अदृश्य शक्ती’चा अाता शोध घेतला जात अाहे. या प्रकरणामुळे ठाकरे सरकार अाणि मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून आघाडीचे नेते, मंत्री यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. बुधवारी सकाळी पुन्हा ‘सह्याद्री’ विश्रामगृहावर अाघाडीच्या निवडक मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ‘सरकारचा मोठा निर्णय’ जाहीर केला.
म्हणून परमबीरसिंग यांना हटवले:
- १६ वर्षे निलंबित असूनही ६ जून २०२० रोजी परमबीरसिंग यांच्या आदेशाने सचिन वाझे यांची सहायक पोलिस निरीक्षकपदी फेरनियुक्ती
- काही दिवसांतच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून वाझे यांची क्राइम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) प्रमुखपदी नियुक्ती.
- बहुचर्चित टीआरपी घोटाळा, अन्वय नाईक अात्महत्याप्रकरणी “रिपब्लिक’चे संपादक अर्णब गोस्वामींना अटक, कंगना-हृतिक ई-मेल वाद आदी प्रकरणांची जबाबदारी वाझेंकडे दिली.
- अँटिलिया प्रकरणाचा तपासही वाझेंनाच दिला, परंतु टीका झाल्यावर त्यांना हटवले.
परमबीरसिंगांकडे संशयाची सुई;
सचिन वाझे यांनी अँटिलिया स्फोटकांचे नाट्यही परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरूनच केले, असा संशय एनआयएला असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी वाझे यांच्या केबिनमधून काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवज एनअायएच्या हाती लागले. त्याशिवाय लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाइलही जप्त करण्यात आला.
News English Summary: The NIA is said to have suspected that Sachin Vaze also staged the Antilia blast at the behest of Parambir Singh. On Tuesday, the NIA seized some highly sensitive documents from Sachin Vaze’s cabin. Laptops, iPads and mobiles were also seized.
News English Title: NIA will take big action after arrest of Sachin Vaze news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार