22 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

महिला वर्गाकडून भाजप उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा असा निषेध | ट्विटरवर ट्रेंड

Ripped jeans, Trend on Twitter, Uttarakhand, CM Tirath Singh Rawat

मुंबई, १८ मार्च: महिलांच्या रिप्ड जिन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महिलांनी ट्वीटर वर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान ‘रिप्ड जिन्स घालणार्‍या महिला ‘चांगले आदर्श’ ठेवत आल्याचं वक्तव्य काल तिरथ सिंग रावत यांनी केल्यानंतर त्याचे अनेक स्तरांमधून प्रतिसाद येण्यास सुरूवात झाली. अल्पावधीतच नेटकर्‍यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे.

सोबतच महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर कमेंट्स पास करणार्‍या पुरूषी अहंकारी वृत्तीवर पुन्हा बोट ठेवण्यात आले आहे. अनेकींनी फोटो शेअर करत मुली घालत असलेल्या कपड्यांचा आणि त्यांच्यावरील संस्कारांचा थेट संबंध जोडणं बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान या सोशल मीडियावरील ट्रेंडमध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांनी देखील त्यांचा एक फोटो पोस्ट करत तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

तीरथ सिंह रावत हे आठवड्याभरापूर्वीच उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान त्यांनी रिप्ड जिन्स घालणार्‍या महिलांवर टिपण्णी करत हे कसले संस्कार असे म्हटलं आणि बघता बघता त्यांच्यावर आता देशभरातून टीका होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून रावत हे चर्चेमध्ये आहेत.

 

News English Summary: Uttarakhand Chief Minister’s offensive remarks on women wearing ripped jeans have been widely reported on Twitter. Meanwhile, after Tirath Singh Rawat’s statement yesterday that women wearing ripped jeans were setting a ‘good example’, the response from many quarters started. In a short time, netizens have also started posting photos in ripped jeans with #RippedJeans.

News English Title: Ripped jeans trend on Twitter Uttarakhand CM Tirath Singh Rawat statement against women news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x