22 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Health First | रोज सकाळी गरम पाण्यामध्ये हळद मिसळून पिण्याचे जबरदस्त फायदे

Benefits, Drinking turmeric mixed hot water, health article

मुंबई, २० मार्च: दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी अथवा साधे पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देतात आणि ही एक चांगली सवयही आहे. कारण यामुळे शरीराला अनेक चांगले फायदे होतात. तुम्ही जर या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढता. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वे शरीराला मिळतात. जर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन करात तर तुमचे लिव्हर साफ राहते तसेच मेंदूच्या पेशीही सुरक्षित राहतात. याशिवाय याचे अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने काय फायदे होतात.

आपल्याला दररोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उपाशी पोटी गरम पाणी अथवा साधे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर व सर्वसामान्य लोक देत असतात आणि ही सवय आपल्या शरीसाठी फायदेशीर आहे. कारण याने आपल्या शरीराला बरेच उत्तम असे आरोग्यदायी फायदे मिळतात.आणि तुम्ही या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून याचे फायदे अधिक वाढवु शकता. हळदीमध्ये बऱ्यापैकी आपल्या आरोग्याला फायदेशीर असणारे असे तत्वे असतात.

जर तुम्ही दररोज सकाळी हळद मिसळलेले पाणी पिलात तर तुमचे लिव्हर मस्तपैकी साफ राहते आणि मेंदूच्या पेशीही सुरक्षित राहतात. याशिवाय याचे बरेच फायदे आपल्या शरीराला मिळतात. चला तर मंग जाणून घेऊया सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याचे सेवन केल्याने काय फायदे होतात.

पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी हळद ही चांगली मानली जाते. हळदीमुळे पित्ताशयामध्ये पित्तरस तयार होण्यास मदत होते. आणि याच पित्तरसामुळे आपली पाचन शक्ती चांगली होते. जेणेकरून पाचनक्रिया सुरळीत राहते. जर तुम्ही खूप जंक फूड खात असाल तर तुम्हाला दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेंट्री गुण असतात ज्याचा आपल्या शरीराला चांगलाच फायदा होतो. यासोबतच तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर हळदीचा तुम्हाला फायदा आहे. ज्यांना आर्थराइटिसची समस्या आहे अशा व्यक्तींनी या पाण्याने आपल्या दिवसाची सुरूवात करावी.

हळद त्वचेसाठी वरदान मानले जाते. जर तुम्ही याचे सेवन केलेत तर तुमच्या त्वचेचा रंग उजळतो. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.

 

News English Summary: If you add half a teaspoon of turmeric in this water, its benefits will increase. The health benefits of turmeric are found in the body. If you drink this water every morning, your liver will be clean and your brain cells will be safe. In addition, it has many benefits. Learn the benefits of drinking turmeric mixed with hot water in the morning.

News English Title: Benefits of drinking turmeric mixed with hot water in the morning health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x