22 April 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मोदींच्या नव्या भारतापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशातील लोकं जास्त आनंदी - वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट

World happiness report, Pakistan, Finland, India

वॉशिंग्टन, २० मार्च: जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे.

ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत. सकारात्मक भावाच्या श्रेणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही काल हसला होता का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर नकारात्मक भावाच्या व्यक्तींना तुम्ही ज्या दिवशी हसला होता त्या दिवशीच कोणत्याही गोष्टीवरून नाराज झाला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या रिपोर्टमध्ये असे आढळले आहे की, कोरोना महामारीतून धडा घेताना पैसा नाही तर आरोग्यावर जोर द्यावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने हा रिपोर्ट तयार केला आहे. यामध्य़े डेन्मार्क दुसऱ्या आणि स्वित्झरलँड तिसऱ्या नंबरवर आहे. 149 देशांच्या या आनंदाचा स्तर शोधण्यासाठी गॅलपच्या आकड्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये जीवनाची गुणवत्ता, सकारात्मकपणा आणि नकारात्मकतेच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

भारतानंतर बुरूंडी, येमन, टांझानिया, हैती, मालावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तान या देशांचा नंबर लागतो. मात्र, सख्खे शेजारी असलेले नेपाळ 87, पाकिस्तान 105, चीन 20, बांग्लादेश 101, श्रीलंका 129 आदींनी भारताला मागे टाकले आहे. चीन गेल्यावर्षी 94 व्या स्थानी होता.

 

News English Summary: The happiest country in the world has been surveyed. It contains amazing information. The people of Finland are the happiest in the world. Significantly, Finland has topped the World Happiness Report for four consecutive years. India ranks 139th out of 149 countries.

News English Title: World happiness report declared Pakistan and Bangladesh peoples are also more happy than India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या