मोदींच्या राजवटीत उज्ज्वला याेजनेतील गॅसही परवडेना | मार्केटिंग फोटोतील महिला पुन्हा चुलीकडे
औरंगाबाद, २० मार्च: मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
परंतु याच योजेतील लाभार्थी मोदी सरकारच्या महागाईला इतके कंटाळले आहेत की त्यांनी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत मिळालेले गॅस बाजूला करून चूल पेटवणं अधिक सोयीचं आणि परवडणारं असल्याचं म्हटलं आहे. सरकारही महागाईकडे गांभीर्याने पाहात नसल्याने या योजनेतील गॅसचा काहीच फायदा नसून उलट न परवडणारं असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अजिंठ्याच्या शेख आयेशा शेख रफिक यांना ७ सप्टेंबर २०१९ रोजी उज्ज्वला कनेक्शन याेजनेंतर्गत आठ कोटीवे गॅस कनेक्शन देण्यात आले हाेते. परंतु, आजपर्यंत नगण्य सबसिडी आणि सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने आयेशा यांच्यावर पुन्हा चूल मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्या वेळी गॅस मोफत आणि तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळाल्याने आयेशा शेख यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पहिले रिफिल सिलिंडर संपल्यावर फ्री मिळाले. नंतर त्यांच्याकडून चार्जेस घेतले गेले.
आता चक्क गॅसचा भाव ८३२ वर गेल्याने हात मजुरी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेख आयेशा यांना गॅस रिफिल भरून घेण्यासाठी पैसे नसल्याने त्या पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर ग्यावर परिणाम हाेत असल्याने धुरमुक्त ग्राम याेजनेचा फज्जा उडाला आहे. उज्वल गॅस योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. परंतु,आता गॅस टाकीचा भाव आठशेच्यावर गेल्याने गरिबांना ते घेणे परवडत नसल्याने परत ते चुलीवर आले आहेत. गॅसचे भाव कमी करावे किंवा सबसिडी वाढवावी अशी मागणी हाेत आहे.
धक्कादायक म्हणजे सबसिडी केवळ ३ रुपये आणि गॅस सिलेंडरच्या भावात दर महिन्याला वाढ होतं आहेत. आता गॅस सिलेंडर जवळपास ८३२ पर्यंत गेला. मात्र सबसिडी फक्त ३ रुपये २६ पैसेच येत आहेत. किमान देशाच्या सर्वच्च पदावरी व्यक्तीच्या हस्ते दिलेल्या योजनेचा लाभ व त्याच लाभार्थीचे होणारे हाल हा विरोधभास असून केंद्रातून अशा प्रकरणाकडे लक्ष द्यावे असं म्हटलं आहे.
News English Summary: The reality behind the marketing plans is now coming to the fore. The Modi government has seen many schemes for marketing purposes only. The topic of discussion in Modi’s ‘Chai Pe Charcha’ and ‘Mann Ki Baat’ is Ujjwala Gas Yojana.
News English Title: PM Narendra Modi launch Ujjawal Gas Yojana fact today news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार