22 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण | राज ठाकरेंकडून प्रश्न चिन्ह उपस्थित

Sachin Vaze, Shivsena, MNS chief Raj Thackeray

मुंबई, २१ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे यांना शिवसेनेत कोणी आणलं, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. याचा अर्थ सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली, मात्र सरकारने त्यामागील कारण स्पष्ट केलेलं नाही यावर देखील राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना १२ कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

 

News English Summary: MNS chief Raj Thackeray raised the question as to who brought Sachin Waze, who was suspended for 17 years in the Khwaja Yunus case, into the Shiv Sena, and who was the person who took him to join the Shiv Sena. Devendra Fadnavis had said that Uddhav Thackeray had requested Sachin Vaze to be reinstated in the police service when the BJP and Shiv Sena were in power. This means that Sachin Waze is a very close person of Chief Minister Uddhav Thackeray, which Raj Thackeray tried to draw attention to.

News English Title: Who brought Sachin Vaze in Shivsena question raised by MNS chief Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x