21 November 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

भाजपच्या फसव्या जाहिराती | पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भाड्याच्या घरात

Congress, Rahul Gandhi, Pantanpradhan Awas Yojana

कोलकाता, २२ मार्च: मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना आणि पंतप्रधान आवास योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.

परंतु याच योजेतील लाभार्थी मोदी सरकारच्या महागाईला इतके कंटाळले आहेत की त्यांनी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत मिळालेले गॅस बाजूला करून चूल पेटवणं अधिक सोयीचं आणि परवडणारं असल्याचं म्हटलं आहे. सरकारही महागाईकडे गांभीर्याने पाहात नसल्याने या योजनेतील गॅसचा काहीच फायदा नसून उलट न परवडणारं असल्याचं लाभार्थींनी म्हटलं आहे. त्यानंतर आता भाजपच्या अजून एका फसव्या जाहिरातीचं वास्तव समोर आलं आहे.

कारण पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. आता भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी पक्षातर्फे अधिकृत संकल्प पत्र जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने वर्तमानपत्रात जाहिरातांचा सपाटा लावला आहे. परंतु, यातीलच एका जाहिरातीमुळे भाजपच भांडं फुटलं आहे.

झालं असं की 25 फेब्रुवारी रोजी कोलकता येथील जवळपास सर्वच वर्तमानपत्रात पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका महिलेचा फोटो देखील छापण्यात आला आहे. या महिलेला पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळाल्याचं दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आत्मनिर्भर भारत-आत्मनिर्भर बांगला असंही या जाहिरातीत लिहिलं असून बंगालमधील 24 लाख कुटुंब आत्मनिर्भर बनल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र उज्ज्वल , हा दावा खोटा असल्याचं सांगत आजही आम्ही भाड्याच्या घरात राहत असल्याचे जाहिरातीत फोटो असलेल्या लक्ष्मी देवी यांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील या संदर्भातील जाहीरातीचा फोटो समाज माध्यमांवर शेअर केला आहे. तसेच, सातत्याने सांगितल्यानंतरही खोटं ते खोटंच राहतं, असं त्यांनी म्हटलंय. हॅशटॅग फॅक्टचेक असे म्हणत राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi also shared a photo of the advertisement on Twitter. He also said that even after telling the truth, it remains a lie. Rahul Gandhi shared this photo saying hashtag fact check.

News English Title: Congress leader Rahul Gandhi shared a photo of the advertisement of Pantanpradhan Awas Yojana on Twitter news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x