22 April 2025 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी | परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव

A petition, Supreme Court, Parambir Singh

मुंबई, २२ मार्च: परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ​​​​​​मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें पत्र लिहीले होते. यात असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर (API) सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संरक्षण असून, देशमुखांनी वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे म्हटले होते. परमबीर यांनी पत्रात हेदेखील म्हटले होते की, आपल्या चुकीच्या कामांना लपवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवले जात आहे. परमबीर यांनी आपल्या आरोपाशी संबंधित अनेक पुरावेदेखील याचिकेसोबत दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ही याचिका मंजुर केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात परमबीर म्हणतात की, ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना अनेकदा आपले शासकीय निवासस्थान ‘ज्ञानेश्वर’मध्ये बोलवले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडेदेखील उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.’ परमबीर सिंह यांनी पत्रात पुढे लिहीले की, ‘मी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि NCP चीफ शरद पवारांनाही सांगितले आहे.

 

News English Summary: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh. The allegations you have made in your letter to the Chief Minister. Singh has demanded an inquiry into the allegations. All the allegations made by you in this petition should be investigated. Parambir Singh has demanded a CBI probe into the Anil Deshmukh and recovery case.

News English Title: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या