मुंबईकरांनो उद्या मुंबईतील 'या' विविध ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुंबई, २२ मार्च: मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या (23 मार्च) दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बृह्न्मुंबई महानगरपालिकेने अर्थात बीएमसीने दिली आहे. बीएमसी कडून 12 तासांसाठी हा पाणीपुरवठा प्रभावित असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच उद्यासाठी देखील पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये पालिकेच्या एस वॉर्ड अर्थात भांडूप भागामध्ये 12 तास पाणी पुरवठा खंडीत असेल तर के-ईस्ट, एच ईस्ट, जी नॉर्थ म्हणजेच दादर पश्चिम, माहीम, धारावी, वांद्रे ईस्ट, अंधेरी ईस्ट या भागामध्ये देखील पाणीपुरवठा पालिकेकडून कमी दाबाने केला जाणार आहे. 23 मार्चच्या सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तास हा पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा कधी आणि कसा प्रभावित असेल?
धारावी:
प्रेम नगर, नाईक नगर, धारावी लूप रोड या भागात सकाळी 4 ते दुपारी 12 कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तर धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, एकेजी नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभार वाडा, संत गोराकुंभार मार्ग या ठिकाणी दुपारी 4 ते रात्री 9 या पाच तासासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
भांडुप:
जय भीमनगर, बेस्ट नगर, आरे रोड परिसर, फिल्टर पाडा भागात सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
अंधेरी (पूर्व):
चाकाला, प्रकाशवाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी, हनुमान नगर, माटा नगर, शिवाजी नगर, शाहिद भगतसिंग वसाहत, चरत सिंग वसाहत, मुकुंद हॉस्पिटल, लेलेवाडी, इंदिरा नगर,मापखान नगर, टाकपाडा, मापखान नगर, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, साग बाग, मरोळ औद्योगिक वसाहत, रामकृष्ण मंदिर रोड, जे.बी.नगर, बगरखा रोड, कांतीनगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच,कबिर नगर,बामणपाडा, पारशीवाडी, तरुण भारत वसाहत,इस्लाम पुरा, विमानतळ क्षेत्र, देऊळ वाडी, पी अँड टी कॉलनी या परिसरात दुपारी 2 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
- विजय नगर, मिलिटरी मार्ग, वसंत ओएसिस, गावदेवी, मरोळ गाव,चर्च मार्ग, दिल व्हीव सोसायटी, कदम वाडी या परिसरात संध्याकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
- मुळगाव डोंगरी, एमआयडीसी रोड 1 – 23, यशवंत नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा या परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
- डीपी रोड, महाकाली नगर , बामण दयापाडा, इन्कम टॅक्स कॉलनी या परिसरात सकाळी 6 ते दुपारी 2 या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
- पवईतील अँकर ब्लॉक पवई मधील तानसा (पूर्व) सागरी ब 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जल झडप तसेच पवई उच्च स्तरीय जलाशय -1 इनलेटर दुरुस्तीचे काम पालिकेकडून उद्या करण्यात येणार आहे त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर हा परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
News English Summary: In some parts of Mumbai, the water supply will be cut off tomorrow (March 23) and in some places it will be supplied at low pressure, the BMC said. The BMC said the water supply would be affected for 12 hours. Therefore, the citizens have been appealed to keep the required stock of water for today and tomorrow as well.
News English Title: Mumbai the water supply will be cut off on March 23 in some places news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार