महाराष्ट्र ATS'ची कारवाई थेट गुजरातपर्यंत | तपास NIA'कडे जाऊनही तो रोकड भोवतीच..
मुंबई, २३ मार्च: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र ATS तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून ATS’ने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.
मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा ट्रान्सीट रिमांडला कोर्टाकडून परवानगी मिळाली असून त्यांची NIA कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यामुळे वाझे यांच्या कोठडीसाठी २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.
The car seized today from Daman is being analysed by FSL in Mumbai: Maharashtra ATS Chief#MansukhHiren pic.twitter.com/YF1uZTVaOr
— ANI (@ANI) March 23, 2021
दरम्यान, या प्रकरणी नेमका गुन्हा कसा घडला, हे आरोपी विनायक शिंदेनं घटनास्थळी जाऊन सांगितलं”, असं जयजीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. “गुन्ह्यात वापरलेल्या सिम कार्डचा एटीएसने शोध लावला. हे सिमकार्ड एका बुकीने गुजरातमधील एका कंपनीच्या नावे खरेदी केले होते. प्राथमिक चौकशीत सिमकार्ड नरेश गोर याने सचिन वाझे याच्या सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदेकडे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली आहे. विनायक शिंदे लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणी अटकेतला आरोपी आहे. तो पॅरोलवर असताना हा गुन्हा त्याने केला. त्याने मनसुखला घटनास्थळी बोलवून घेऊन आणि हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. आरोपीने घटनास्थळी जाऊन गुन्हा कसा केला, याचे प्रात्याक्षिक केले आहे”, असं जयजीत सिंग यांनी एटीएसकडून सांगितलं.
News English Summary: Maharashtra ATS is investigating the death of Mansukh Hiren. ATS chief Jayjit Singh said that ATS had arrested Naresh Ramniklal Gore and Vinayak Balasaheb Shinde on the basis of convincing information and that Vinayak Shinde had killed Mansukh. The ATS has reached the root of Mansukh’s murder and Singh has raised the possibility of arresting others in the case.
News English Title: ATS Chief on Mansukh Hiren murder case Sachin Vaze custody NIA news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News