22 November 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

त्या केवळ फोनच टॅप करत नव्हत्या | तर फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अपक्ष आमदारांना फोडण्यातही सक्रिय..

Journalist Vijay Chormare, IPS Rashmi Shukla, BJP, Devendra Fadnavis

मुंबई, २३ मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला गेले आहेत आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस करणार आहेत. याबबातची माहिती फडणवीस यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत दिली होती.

पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडं त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असं फडणवीस म्हणाले होते.

त्यानंतर फडणवीसांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसंच रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे. रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सत्यपरिस्थिती बाहेर आल्यानंतर सरकारने त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या दोन तीन दिवसांच्या निवेदनात सातत्याने रश्मी शुक्ला यांचा उल्लेख होतोय. मी गेल्या दोन पोस्टमध्ये पोलिस आणि प्रशासनातील ज्या उजव्या मंडळींचा उल्लेख करतोय त्यामध्ये प्राधान्याने उल्लेख करावे असे नाव म्हणजे रश्मी शुक्ला. मात्र यावर आता वरिष्ठ पत्रकार देखील मत व्यक्त करत आहेत. याच विषयाला अनुसरून पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलं आहे की, “‘त्या’ नुसत्या फोनच टॅप करत नव्हत्या, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपक्ष आमदारांना भाजपकडे आणण्यासाठीही सक्रिय होत्या.

 

News English Summary: Not only she was tapping the phone, but Devendra Fadnavis was also active in bringing independent MLAs to the BJP to become the Chief Minister said journalist news updates.

News English Title: Journalist Vijay Chormare criticised over BJP politics and IPS lobby support news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x