23 November 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार | पण सेनेविरुद्ध दिल्ली ते गल्ली थयथयाट का? - सविस्तर

Anti Shivsena, MP Navneet Rana, MLA Rani Rana

अमरावती, २४ मार्च: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा या अमरावतीतून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्या. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र निकलानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पलटी मारत भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला.

मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येणार आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यानंतर आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळेल या आशेने भाजप सोबत गेलेल्या राणा दाम्पत्याचा राजकीय अंदाज चुकला आणि राज्यात भाजपचं सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने अमरावतीत भविष्यातील राजकारण कठीण होणार याची त्यांना जाणीव झाली असावी. त्यामुळे अपक्ष आमदारांपैकी रवी राणा हेच शिवसेनेविरुद्ध आदळाआपट करताना दिसतात. कारण भविष्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाठिंबा मिळाल्यास दोघांचा पराभव निश्चित समाजला जातोय. त्यामुळे राणा दाम्पत्याचा राजकीय प्रवासाला देखील ग्रहण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

परिणामी काही होउ दे पण फडणवीस मुख्यमंत्री होऊ देत यासाठी त्यांचा अमरावती आणि मुंबई ते दिल्ली पर्यंत शिवसेनेविरुद्ध थयथयाट पाहायला मिळतोय. एकूण राजकीय गणितं चुकल्याने सध्या एकाच घरातील खासदार आणि आमदार हे ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक होताना दिसत आहेत. पण त्यामागील खरं कारण हे अमरावतीमधील त्यांचा २०२४ मधील भविष्यकाळ असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात.

 

News English Summary: After defeating former Shiv Sena MP Anandrao Adsul, Navneet Rana became an MP from Amravati in the 2019 Lok Sabha elections. However, with the support of the NCP and the Congress, his victory was easy. However, after the result, Navneet Rana and MLA Ravi Rana were overthrown and public support was given to the BJP government.

News English Title: Anti Shivsena political reaction of MP Navneet Rana and MLA Rani Rana news updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x