25 November 2024 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

गंगापूर साखर कारखाना १५ कोटी ७५ लाखांचा कथित अपहार | भाजप आ. प्रशांत बंब यांची चौकशी

BJP MLA Prashant Bamb, Gangapur sugar factory scam

मुंबई, २५ मार्च: गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणात गंगापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांची बुधवारी पाेलिसांनी चौकशी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात जवळपास दीड तास झालेल्या चौकशीमध्ये बंब यांच्यावर एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांविषयी विचारपूस करण्यात आली.

मागील काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. २०१३ मध्ये कारखान्याची विक्री सर्व सभासदांनी एकत्र येत डीआरटी कोर्टात पैसे जमा केले होते. मात्र त्यानंतर कारखान्याचा विक्रीची प्रक्रिया रद्द झाल्याने न्यायालयाकडून ही रक्कम कारखान्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब व इतर सोळा जणांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत यातील १५ कोटी ७५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, राज्यभर हे प्रकरण गाजले. मागील काही महिन्यांपूर्वी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला. जानेवारी महिन्यात यातील काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने सहा जणांचे अर्ज फेटाळून लावले. ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पैठणचे उपविभागीय पाेलिस अधिकारी गोरख भामरे यांची पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह इतर आरोपींना बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पाेलिस अधिकारी गाेरख भामरे यांनी जवळपास दीड तास बंब यांची चौकशी केली. यात तक्रारदाराने केलेल्या प्रत्येक आरोपाविषयी बंब यांना प्रश्न विचारण्यात आले. या वेळी बंब यांनीदेखील कारखान्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली. यापुढेदेखील गरज पडल्यास पुन्हा बोलावण्यात येऊ शकते.

 

News English Summary: BJP MLA Prashant Bamb was on Wednesday questioned by the police in connection with the alleged embezzlement of Rs 15.75 crore at the Gangapur sugar factory. During the nearly one-and-a-half-hour interrogation at the police superintendent’s office, the allegations made in the FIR against Bombay were questioned.

News English Title: Gangapur sugar factory scam BJP MLA Prakash Bamb under investigation news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x