22 April 2025 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

...तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार

Pre examination opportunity, 10th standard, 12th standard, Covid 19 pandemic

मुंबई, २६ मार्च: १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

पण काय आहेत अटी?

  1. संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल
  2. विद्यार्थ्यांच्या घरात
  3. परिसरात कोरोना रुग्ण असतील
  4. विद्यार्थी राहात असलेला भाग सील केला असेल

आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल. १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या अशी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. त्यात पालकांची चिंता वाढल्याने शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: There is great news for 10th and 12th class students and parents. Education Minister Varsha Gaikwad has informed that a special examination will be held in June for 10th and 12th class students who will not be able to appear for the exams due to corona.

News English Title: Pre examination opportunity to 10th and 12th standard students during covid 19 pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या