22 November 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

पंढरपूर पोटनिवडणूक | महाविकास आघाडीची दोस्तीत कुस्ती | शिवसेना जिल्हा प्रमुखाची बंडखोरी

Pandharpur, by poll election, Shivsena, Shaila Godse

पंढरपूर, २६ मार्च: राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. शैला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पहिले पाऊल टाकले आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथे निडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदावारी अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची उमेदवारी म्हणून मी अर्ज भरला असल्याचे गोडसे यांनी सांगितले. तसेच, बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचेही गोडसे म्हणाल्या. गोडसे यांच्या या भूमिकेमुळे आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

News English Summary: After the untimely demise of NCP leader Bharat Bhalke, by election of Pandharpur Mangalwedha assembly constituency has been declared. However, in the Pandharpur Mangalwedha Assembly by-election, the Mahavikas Aghadi has suffered a major blow. Shiv Sena Mahila Aghadi district chief Shaila Godse raised the flag of rebellion here and filed her candidature in a bullock cart.

News English Title: Pandharpur by poll election Shivsena district chief Shaila Godse raised the flag of rebellion news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x