22 November 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

मनातही केवळ निवडणुका? | मन की बात'मध्ये त्या राज्यातील लोकांचे विशेष कौतुक

PM Narendra Modi, Maan Ki Baat, corona pandemic

नवी दिल्ली, २८ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. मन की बातच्या 75 व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी लावलेल्या जनता कर्फ्यूचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदाच देशातील लोकांनी जनता कर्फी हा शब्द ऐकला आणि हा शब्द जगासाठी आश्चर्यचकित ठरला. यावेळी मोदींनी कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी ‘दवाई भी-कड़ाई भी’ या मंत्राचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, ३२ मिनीट चाललेल्या या संभाषणामध्ये मोदी यांनी निवडणूक असलेल्या चार राज्याचे उल्लेख करायले विसरले नाही. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश असून त्यांनी त्या राज्याची आणि तेथील लोकांची मोठ्या प्रमाणावर कौतूक केले. यावितिरिक्त त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांवरदेखील भाष्य केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, शेतीच्या आधुनिकीकरणामध्ये आम्ही खूप मागे असून आम्हाला काळानुसार बदल करता यायला हवे.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षीच्या ‘जनता कर्फ्यू’ची आठवण करुन देत हा जनता कर्फ्यू हा अभूतपूर्व असून येणाऱ्या पिढ्यांना त्याचा अभिमान वाटेल असे ते म्हणाले. मागील वर्षी मार्च महिन्यात देशातील जनतेने प्रथमचं जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला होता. परंतु, या महान देशाच्या सामर्थ्याचा अनुभव पहा, जनता कर्फ्यू हा शब्द संपूर्ण जगासाठी आश्चर्यचकित करणारा ठरला. हे शिस्तीचे अभूतपूर्व उदाहरण होते. देशातील जनतेने जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पिढ्या-न-पिढ्यांना या एका गोष्टीबद्दल नक्कीचं अभिमान वाटेल.

याशिवाय देशातील जनतेने कोरोना योद्ध्यांचा आदर करण्यासाठी थाळी वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे आदी गोष्टी केल्या. यामुळे कोरोना योद्धाच्या हृदयाला किती स्पर्श झाला हे आपल्याला माहिती नाही. या आदराने भारून गेलेल्या कोरोना योद्ध्याने वर्षभर न थांबता आपले कर्तव्य बजावले असं मोदी म्हणाले.

 

News English Summary: In the struggle for freedom, our fighters underwent innumerable hardships since they considered sacrifice for the sake of the country as their duty. May immortal saga of their sacrifice, ‘Tyaag’ & ‘Balidan’ continuously inspire us towards the path of duty said PM Narendra Modi.

News English Title: PM Narendra Modi Maan Ki Baat on corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x