21 November 2024 9:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | आंदोलक शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट | भाजप आमदाराला नग्न करून चोप

Protesting farmers, thrash Clothes, BJP MLA Arun Narang

चंदीगड, २८ मार्च: मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, सध्या शेतकऱ्यांच्या संताप अनावर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यांचे कपडेही फाडत चोप देण्याचा प्रयत्न देखील झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे. त्यातच आता पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांच्या गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला निशाणा बनल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अरुण नारंग यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.

झालं असं की, अबोहरचे आमदार नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोटमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातला. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढलं. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.

 

News English Summary: Farmers are protesting in Delhi against the Modi government’s 3 agricultural laws. The agitation has been going on on the Delhi border for the last several months and now the farmers are getting angry. A group of farmers attacked a BJP MLA. What is special is that there was an attempt to tear his clothes and give him a beating. The police rescued the angry farmers and took them to safety. It’s all kind of recorded on camera.

News English Title: Protesting farmers thrash BJP MLA Arun Narang tear his clothes news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x