22 November 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाविकास आघाडीतील कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये - उपमुख्यमंत्री

Deputy CM Ajit Pawar, MahaVikas Aghadi, controversial statements

मुंबई, २८ मार्च: राज्यात सध्या अनेक विषयांमुळे सरकारवर आणि विशेष करुन गृहखात्यावर संकट आले आहे. आत्तापर्यंतची या सगळ्या संकटांवर भाजप जेव्हा मबाविकासआघाडी सरकारला टोला लगावत होते तेव्हा त्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांच्या साहाय्याने किंवा सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत होतेच. मात्र, आज सामनामधील रोखतो या सदरात राऊतांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच निशाणा साधला आहे. देशमुखांकडे गृहमंत्री पद अपघाताने आलं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेवर स्वत: अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर ‘रोखठोक’मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी आज बारामतीत कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका अजित पवारांनी राऊतांवर केली.

 

News English Summary: Anil Deshmukh is embroiled in controversy after former Mumbai Police Commissioner Parambir Singh made allegations against the Home Minister. Opposition groups called for a boycott of the assembly. Meanwhile, Shiv Sena MP Sanjay Raut also criticized Deshmukh from ‘Rokhthok’. After this, now Deputy Chief Minister Ajit Pawar has responded to Sanjay Raut’s criticism.

News English Title: Deputy CM Ajit Pawar warn MahaVikas Aghadi leaders over controversial statements news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x