24 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

पवारांच्या आजारपणाचं देखील भाजप नेत्यांकडून संधीत रूपांतर करण्याचं विचित्र राजकारण? | संभ्रमाची मालिका

BJP dirty politics, health issue, Sharad Pawar

मुंबई, २९ मार्च: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी आणि स्वतः सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच दिली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार काल तपासणीसाठी गेले होते. त्यांना पोटात दुखत असल्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर त्यांना पित्त मूत्राशयामध्ये त्रास असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर 31 मार्च रोजी छोटी शस्त्रक्रिया आणि एऩ्डोस्कोपी करण्यात येणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द असणार आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

मात्र स्वतः पवार इस्पितळात अडकल्यानंतर भाजप नेत्यांकडून या गंभीर विषयाला देखील संधीत रूपांतर करण्याचे केविलवाणे प्रकार सुरु झाले आहेत. प्रदेशाध्यक्षांपासून ते आमदारांपर्यंत सर्वजण ट्विट आणि व्हिडिओचा प्रसार करून पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रम वाढविण्याचा प्रकार करत असल्याचं म्हटलं जातंय. भाजपचे अनेक नेते टीव्ही वृत्तवाहिन्यांवर हजेरी लावून मोठ्या प्रमाणावर जोरदारपणे संभ्रम कसा वाढवता येईल याची खबरदारी घेताना दिसत आहेत.

स्वतः पवार इस्पितळात दाखल झाल्याने त्यांना कोणतीही पत्रकार परिषद घेता येणार याची भाजप नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं आजारपण देखील सर्वत्र संभ्रम निर्माण करण्यासाठी वापरलं जातंय असं दिसतंय. मात्र यामुळे भाजप सत्तेसाठी कोणत्या ठरला जाऊन विचार करू शकते याचा अंदाज येऊ लागला शकतो. राष्ट्रवादीने आणि महाविकास आघाडीतील पक्षाने याबाबत अधिकृत भाष्य केलेलं असताना देखील, पवारांचं आजारपण बाजूला सारून सकाळपासून भाजप नेत्यांकडून संभ्रमाच्या मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक मराठी वृत्त वाहिन्यांवर याबाबत चर्चासत्र आयोजित केली असून भाजप नेते मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसत आहे. कळस म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी तर थेट शपथविधी पर्यंतच भाष्य केल्याने यांच्या राजकारणाची किव करावी अशा प्रतिकिया उमटू लागल्या आहेत.

 

News English Summary: NCP president Sharad Pawar was admitted to Breach Candy Hospital yesterday evening. Party leader Nawab Malik and Supriya Sule herself have already informed that she was admitted to the hospital with a complaint of stomach ache

News English Title: BJP dirty politics during serious health issue of Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x