22 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये दोन दिवसात दोन भिन्न रिपोर्ट | लॅब्स टेन्शन वाढवत आहेत?

Covid test lab, Maharashtra

नाशिक, ३० मार्च: एकाबाजूला मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

मुंबईत रविवारी जवळपास 7000 रुग्णांची नोंद झाली. जी मुंबईसारख्या गर्दीच्या शहराची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम उपनगरातले आहेत. आणि दर आठवड्याला याच वॉर्डातील कोरोना रुग्णांची दरवाढ वर खाली होते. रुग्ण दुपटीचा कालावधी पण कमी होत आहे. त्याच बरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढलेला आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट लॅब्स देखील व्यस्त झाल्या आहेत.

राज्यातील अनेक शहरांमध्ये लॅब्स अत्यंत व्यस्त झाल्याचं चित्र असताना राज्यातील विविध शहरातून येणारे लॅब्स रिपोर्ट संशयाचं वादळ निर्माण करत आहेत. नाशिकमध्ये तसा प्रकार समोर आला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना, दुसऱ्या बाजूला एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये आदल्या दिवशी काेराेनाबाधित आणि दुसऱ्या दिवशी काेराेनामुक्त असे अहवाल आल्यामुळे धक्का बसला आहे. एका खासगी हाॅस्पिटलमध्ये २७ मार्च राेजी दाखल झालेल्या एका ७५ वर्षीय महिलेला सुप्रीम या लॅबने काेराेनाबाधित ठरवले व संबंधित महिलेला काेणतीही लक्षणे नसल्यामुळे शंका घेत याच लॅबमधून फेरचाचणीचा आग्रह त्यांच्या मुलाने धरल्यानंतर ताे अहवाल २९ मार्च राेजी निगेटिव्ह आला.

धक्कादायक म्हणजे, पहिला अहवाल बाधित आल्यामुळे संबंधित महिलेला काेविड रुग्णालयात अन्य रुग्णांसाेबत भरती केल्यामुळे आता, पुन्हा काेराेनाची लागण झाली तर जबाबदार काेण? असा प्रश्न हेमंत अहिरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काेराेना चाचणीबाबत मध्यंतरी काही प्रवाद निर्माण झाले हाेते. काही अहवालांबाबत खुद्द पालिका प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालयाने हरकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कारवाईसाठी पाऊल उचलले हाेते. मात्र, संबंधित लॅबने ठाेस उत्तर दिल्यानंतर प्रशासन बॅकफूटवर गेले. अलिकडेच, काेराेनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, दाेन ते चार व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यात साधारणत: एक बाधित असा ट्रेण्ड असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहे. अशातच लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्ती बाधित येत असल्यामुळे त्यांना खराेखर लागण झाली की लॅबच्या चुकांमुळे फुगवटा केला जातोय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

 

News English Summary: The shock came when the same person was reported to be in the same lab the day before as carnivorous and the next day as carnivorous. A 75-year-old woman who was admitted to a private hospital on March 27 was diagnosed with caries by the Supreme Lab and the report came negative on March 29 after her son insisted on re-examination from the same lab as the woman concerned did not have any symptoms.

News English Title: Two types of report of same person in same Covid test lab news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x