22 November 2024 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबईमध्ये खासगी रुग्णालयात 80% बेड कोव्हिड रुग्णांसाठी राखीव

BMC, New guidelines, private hospitals, Corona pandemic

मुंबई, ३० मार्च: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांसाठी 80% बेड आणि 100% आयसीयू बेड आरक्षित करावे लागतील. वॉर्ड वॉर रूममधून कोरोना रूग्णांचे बेड वाटप केले जातील. रूग्णांना थेट भरती करण्यास रुग्णालयांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

BMC च्या मार्गदर्शक सूचनांचे महत्त्वाचे मुद्दे:

  1. प्रायव्हेट रुग्णालयाच्या 80% आणि सर्व ICU बेड कोरोना रुग्णांसाठी रिझर्व्ह ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  2. बीएमसी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम यांना पुन्हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. सर्व रुग्णालयांना त्यांचा ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटर तपासण्यास सांगण्यात आले आहे.
  3. PPE किट्स, मास्क आणि VTM किटचा भरणा करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत.
    वॉर्ड वॉर रूमच्या परवानगीनंतरच खासगी रुग्णालयाच्या कोरोना रूग्णांना दाखल करण्यात यावे.
  4. कोविडच्या गंभीर रूग्णांना त्वरित बेड मिळावा यासाठी सर्व खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांना लक्षणांशिवाय दाखल केले असल्यास त्यांनी तातडीने डिस्चार्ज करण्याची सूचना केली आहे.
  5. वॉर्ड अधिकाऱ्यांकडे रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्याची आणि त्यांच्यासाठी बेडची उपलब्धता ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन संचालक व मुख्य समन्वयक खासगी रुग्णालयाच्या सूचनेनुसार रुग्णांना दाखल केले जाईल.
  6. महापालिकेने प्रत्येक प्रभागात पाच पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी बीएमसी नोडल अधिकारी 24 तास उपलब्ध असतील.
  7. प्रभागांचे सहाय्यक आयुक्त खासगी रुग्णालयात रुग्णांना थेट दाखल केले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवतील. या देखरेखीसाठी शिक्षक किंवा इतर कर्मचारी नियुक्त करण्याचेही निर्देश आहेत.
  8. सर्व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापकांना नोडल अधिकारी 24 तास नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोडल अधिकाऱ्याचा नंबर स्थानिक वॉर्ड वॉर रूमला देण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून बीएमसीला वेळोवेळी माहिती मिळू शकेल.
  9. राज्य सरकारचे म्हणणे आहे की मास्क न लावणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जावा, बीएमसीला यावर निर्णय घ्यायचा आहे. मुंबईत मास्क न लावणाऱ्यांकडून सध्या 200 रुपये दंड वसूल केला जात आहे.

सोमवारी पुन्हा एकदा 5 हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत समोर आले. गेल्या 24 तासांत 5,888 नवीन प्रकरणे आढळली आणि 12 लोक मरण पावले. येथे संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या 4 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबई रुग्णालयांमधील फक्त 23% बेड रिक्त आहेत.
मुंबईत आयसीयू आणि बेड पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.

 

News English Summary: BMC has issued new guidelines for private hospitals in Mumbai due to corona degradation. Accordingly, private hospitals will have to reserve 80% beds and 100% ICU beds for corona patients. Corona patient beds will be allocated from the Ward War Room. Hospitals are prohibited from directly admitting patients.

News English Title: BMC has issued new guidelines for private hospitals in Mumbai due to corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x