22 November 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं

Corona vaccination, India, Covid 19

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.

सध्या रोज दिलेल्या डोसची सरासरी २१ लाख आहे. ही संख्या ५० लाखांवर जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ५० हजार केंद्रांवर एक दिवसात १०० ते २०० डोस देण्याची व्यवस्था आहे. हे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांना सहभागी करून घ्या, असे राज्यांना सूचित करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये ४०% हून अधिक डोस खासगी रुग्णालयांत दिले जात आहेत.

  1. मी ४५ वर्षांवरील आहे. लस घेण्यासाठी काय करावे लागेल?
    cowin.gov.in वर नोंदणी करा. लसीकरण केंद्राचा पर्याय निवडा. ऑनलाइन नोंदणी करू शकत नसाल तर केंद्रावर जा. नोंदणी करा.
  2. लसीकरण केंद्रावर आरोग्यविषयक कागदपत्रे दाखवावी लागतील?
    अजिबात नाही.
  3. कोणते ओळखपत्र ग्राह्य असेल?
    कोणतेही फोटो आयडी कार्ड. उदा. आधार, पॅन, मतदान ओळखपत्र.
  4. मी नोकरदार. दिवसभर काम असते. डोसनंतर विश्रांती घ्यावी लागेल?
    विश्रांतीची गरज नाही. परंतु, लस घेतल्यावर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ताप आलाच तर तापावर गुणकारी औषधे घेऊ शकता.
  5. लसीचे साइड इफेक्ट कोणते?
    दंडावर सूज येऊ शकते. तापही येऊ शकतो. हे सामान्य परिणाम आहेत.
  6. खाण्यापिण्याचे पथ्य काय?
    फक्त एकच लक्षात ठेवा, लस घेताना पोट रिकामे नसले पाहिजे.
  7. लस घेतल्यावर व्यायाम किंवा जॉगिंग करू शकतो का?
    नियमित दिनचर्येत बदल करू नका. मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित औषधे चालू असतील तर ती घेणे चालू ठेवा.
  8. गर्भवती महिलांना लस देता येईल?
    लस घेतल्यानंतर तीन महिने तरी गर्भधारणा होऊ देऊ नये.
  9. लसीचा पहिला व दुसरा डोस यात नेमके किती अंतर ठेवणे चांगले आहे?
    दोन प्रकारच्या लसी आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन. कोविशील्डचा दुसरा डाेस ६ ते ८ आठवड्यांत घ्यायला हवा. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी अँटिबॉडी तयार होतात. कोव्हॅक्सिन डोस ४ ते ६ आठवड्यांनी घ्यावा.
  10. कोणती लस घ्यावी याची निवड मी स्वत: करू शकतो का?
    कोणत्या केंद्रावर कोणती लस आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हवी ती लस असलेले केंद्र निवडू शकता. दाेन्ही लसी चांगल्या आहेत.
  11. लस घेतल्यानंतर मास्क आणि सुरक्षित अंतर किती दिवस पाळणे गरजेचे आहे?
    जोवर सरकार देश कोरोनामुक्त घोषित करत नाही तोवर… जे सध्या तरी शक्य नाही. म्हणून मास्क आणि अंतर राखणे सोडणे म्हणजे कोरोनाला निमंत्रणच.
  12. कोरोना झालेल्यांनीही लसीचा डोस घ्यायला हवा का?
    होय, डोसमुळे शरीरात अँटिबॉडी प्रोटीन वाढतात. दुसरा फायदा म्हणजे लस घेतल्यावर संसर्ग झाला तरी गंभीर आजारी पडण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होऊन जाते.
  13. जादा सर्दी आहे आिण थोडा तापही आहे. या स्थितीत लस घेऊ शकतो का?
    चाचणी निगेटिव्ह असेल तर डोस घेऊ शकता. संसर्ग असेल तर मात्र डोस घेऊ नका. कोरोनातून बरे झाल्यानंतर ४-६ आठवड्यांनी लस घ्यायला हवी.
  14. लस अनिवार्य नाही, तर मी लस घ्यायची नाही असा निर्णय घेऊ शकतो का?
    होय, तुम्ही ठरवू शकता. परंतु, असे करून तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि समाजासाठी कायम धोका ठराल.

 

News English Summary: From today, all people over the age of 45 in the country will be able to get the dose of corona vaccine. Until now, only health workers and frontline workers, those with serious illness over 45 years and senior citizens above 60 years were vaccinated. Now the population participating in this vaccination campaign is going out for work. It is not possible for them to stay at home. Therefore, the government thinks that after April 1, India will be the most vaccinated country in the world.

News English Title: Corona vaccination for age above 45 will start from today in India news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x