22 November 2024 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सध्या लॉकडाउनचा विचार नाही, पण यंत्रना सज्ज ठेवणं सरकारचं काम - आरोग्यमंत्री

Lockdown, Maharashtra, Covid 19

मुंबई, ०१ एप्रिल: महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. मात्र राज्य सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांनी सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात आरटीपीसीआर चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये केवळ 500 रूपये मोजावे लागणार आहेत. रुग्णाच्या घरातून नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रूपयांपेक्षा अधिक किंमत आकारता येणार नाही असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड 19 निदानासाठी आरटी पीसीआर अंतिम आणि खात्री लायक टेस्ट मानली जात आहे.

 

News English Summary: Right now no decision has been taken to lock down in Maharashtra. However, all our discussions are moving in the same direction. But that doesn’t mean the state will have a lockdown. However, the state government needs to be prepared in this way, said Health Minister Rajesh Tope.

News English Title: Right now no decision has been taken to lock down in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x