22 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक

CM Uddhav Thackeray, Corona situation

मुंबई, ०२ एप्रिल: राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.

गुरुवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 8,646 प्रकरणे आढळली. मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे 88,710 नवीन प्रकरणे समोर आली. जे फेब्रुवारीच्या तुलनेत 475 % जास्त आहे. या दरम्यान 216 लोकांचा जीव गेला जो फेब्रुवारीच्या तुलनेत 181% जास्त आहे. तर संपूर्ण राज्यात 6.6 लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली जी फेब्रुवारीच्या तुलनेत 400% जास्त आहेत.

राज्याती या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन;

मुंबई: ज्या सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत, त्या सोसायटी सील केल्या आहेत.
बीड: 26 ते 4 मार्चपर्यंत लॉकडाऊन.
नांदेड: 25 ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन.
नंदुरबार: 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing rapidly. A situation like re-lockdown has now arisen. Chief Minister Uddhav Thackeray has convened an important meeting at Varsha’s residence at 4.30 pm today to review the Corona situation in the state.

News English Title: CM Uddhav Thackeray has convened an important meeting at Varsha residence to review the Corona situation news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x