23 November 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

पुणे | दिवसभर जमावबंदी तसेच संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी

Pune, stricken corona rules, city administration, DCM Ajit Pawar

पुणे, ०२ एप्रिल: राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यातील मुख्य शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांची चिंताही वाढली आहे. पुण्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (२ एप्रिल) पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक झाली.

यावेळी, पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नसले तरी निर्बंध कडक करणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, थोड्याच वेळापूर्वी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद झाली आहे. या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की, “पुण्यात दिवसभर जमावबंदी तर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी लागू असेल. हे सर्व नियम उद्यापासून (३ एप्रिल) संपूर्ण जिल्ह्यात लागू होतील.

अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

News English Summary: The corona condition in the state is getting worse day by day. The threat of corona is increasing in major cities and districts of the state. Against this backdrop, the concern of both Mumbai and Pune has also increased. Against the backdrop of the situation in Pune, a corona review meeting of Pune district was held today (April 2) in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar.

News English Title: Pune stricken corona rules after city administration meeting news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x