23 November 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवा । नक्की वाचा

immunity power

मुंबई ५ एप्रिल : कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक जोरदार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. पण आपण देखील या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं तितकचं गरजेच आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की वाचा. पण आहारात या पदार्थंचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या…

1) थंड शुध्द खोबरेल तेल

खोबरेल तेल रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप मदत करते. शुध्द नैसर्गिक खोबरेल तेल अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. नारळाच्या तेलात मोनोलोरीन असते, जे शरीरातील अपायकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे.

2) आले

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आले अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो.

3) काळी मिरी

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरीदेखील फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते (5 Immunity Booster Food During Corona Pandemic).

4) हळद

काळी मिरीप्रमाणेच हळद देखील एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहेत. जर आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पडश्यात आराम पडतो.

5) कलौंजी

काळ्या तीळाप्रमाणे दिसणारा कलौंजी हा मसाल्यातील घटक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यातदेखील खूप मदत करतो. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

 

News English Summary: The number of corona patients is increasing rapidly day by day. So the health system has also become vigilant. But we also need to take care of ourselves these days. Definitely read home remedies to boost immunity. But be sure to consult a doctor before including these foods in your diet ..

News English Title: Boost your immunity in Corona crisis health news update

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x